डॉ. माया वाठोरे यांचा पालकमंत्री ना. मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हा युवा पुरस्कार देवून सत्कार
वाशिम – शैक्षणिक, सामाजीक, आरोग्य आदी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सेवाव्रती डॉ. माया वाठोरे यांचा २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी पोलीस मुख्यालय परिसरात झालेल्या विशेष पुरस्कार वितरण कार्यक्रमात जिल्हयाचे नवनियुक्त पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या उपस्थितीत जिल्हा युवा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी ना. मुश्रीफ यांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देवून डॉ. वाठोरे यांचा सत्कार करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षापासून केलेल्या चौफेर कामगिरीची दखल घेवून क्रीडा विभागाच्या वतीने व जिल्हा युवा पुरस्कार निवड समितीच्या मान्यतेने युवती या घटकातील वर्ष २०२२-२३ या वर्षातील जिल्हा युवा पुरस्कार डॉ. माया वाठोरे यांना जाहीर करण्यात आला होता. प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी पोलीस मुख्यालय परिसरात झालेल्या विशेष समारंभात नवनियुक्त पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ. वाठोरे यांना देण्यात आला. ग्रामीण भागात जन्म झालेल्या डॉ. माया वाठोरे यांनी ग्रामीण जीवन जवळून पाहीले आहे. दुर्गम भागातील नागरीकांना भेडसावणार्या समस्यांची त्यांना जाण आहे. त्यामुळे त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रात आपल्या परीने जनजागृतीची कास धरली आहे. त्यांच्या या कार्याची शासनाने दखल घेवून सरकारी क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणारा जिल्हा युवा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारामुळे आपल्याला नव्या उर्जेने समाजसेवा करण्याचे बळ मिळाले असून आपण अधिक जोमाने कार्य करु असा विश्वास डॉ. माया वाठोरे यांनी वक्त करुन शासनाचे आभार मानले आहे. याआधी त्यांना शासनाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दरम्यान मिळालेल्या पुरस्काराबद्दल जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने डॉ. वाठोरे यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.
डॉ. माया वाठोरे यांचा पालकमंत्री ना. मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हा युवा पुरस्कार देवून सत्कार
आमच्याबद्दल
भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि० वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि० वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)
संपर्क
Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE
SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505
CELL.9765332897
hellowashim.in