20.9 C
New York
Tuesday, September 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

स्वातंत्र्य दिनी जिल्हा परिषदेत ध्वजारोहण घनकचरा व्यवस्थापन नियम 2026’ जनजागृती अभियानाचा शुभारंभ वाशिम

स्वातंत्र्य दिनानिमित्त वाशिम जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अर्पित चौहान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गणेश कोवे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत व राज्यगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. तसेच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर ‘घनकचरा व्यवस्थापन नियम 2026’ बाबत उपस्थितांना शपथ देण्यात आली. 10 दिवसीय सोशल मीडिया अभियानाचा शुभारंभ स्वच्छ भारत मिशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘घनकचरा व्यवस्थापन नियम 2026’ या 10 दिवसीय सोशल मीडिया IEC अभियानाचा शुभारंभही यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांच्या हस्ते करण्यात आला. हे अभियान दि. 15 ते 24 ऑगस्ट 2026 या कालावधीत राबविण्यात येणार असून, यादरम्यान घनकचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. 10 दिवस, 10 संदेश: अभियानांतर्गत दररोज घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित विविध विषयांवर सोशल मीडिया पोस्टर, इन्फोग्राफिक्स, व्हिडिओ तसेच अन्य माध्यमांतून संदेश प्रसारित केले जाणार आहेत. अभियानाच्या पहिल्या दिवशी ‘स्वच्छ पर्यावरण हा मूलभूत अधिकार’ या विषयातून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची माहिती देण्यात येणार आहे. त्यानंतर घरगुती कचऱ्याचे चार प्रकारांत वर्गीकरण, उघड्यावर कचरा न टाकणे, झाकलेल्या घंटागाडीचा वापर, ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती, प्लास्टिकमुक्त गाव, बल्क वेस्ट जनरेटरची जबाबदारी, जुन्या कचऱ्याची वैज्ञानिक विल्हेवाट, शाळा-अंगणवाडी व सार्वजनिक संस्थांची भूमिका तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवरील दंडात्मक कारवाई आदी विषयांवर जनजागृती केली जाणार आहे.  जिल्ह्यातील ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रे, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, युवक तसेच ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनीही सोशल मीडियावरील अभियानातील संदेश जास्तीत जास्त शेअर करून स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृतीस हातभार लावावा, असे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी सांगितले. यासाठी त्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त समाजमाध्यमांवर व्हिडिओ संदेशही प्रसारित केला. ‘स्वच्छ पर्यावरण – प्रत्येक नागरिकाचा हक्क’ हा अभियानाचा प्रमुख संदेश असून, #SWMRules2026 #SwachhBharatMission #ZPWashim #CleanVillage #iecCampaign हे हॅशटॅग वापरून अभियान व्यापक करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.कार्यक्रमाला पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय गणविर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सु. ब. जाधव, शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक गजानन खुळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग ठोंबरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश कान्हेकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन उपशिक्षण अधिकारी गजानन डाबेराव यांनी केले.राम श्रृंगारे, जनसंपर्क अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम दैनिक भारत संग्राम ले आउट वर बनवून द्या

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in