*केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा जिल्हा दौरा*
वाशिम, दि. ६ डिसेंबर (जिमाका): केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव दि.७ डिसेंबर रोजी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
त्यांच्या दौऱ्यानुसार सकाळी ११ वाजता “मातोश्री” शिवाजी नगर मेहकर जि. बुलडाणा येथुन मोटारीने वाशिमकडे प्रयाण,
दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात
राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत १०० दिवसीय क्षयरोग मोहीम
उदघाटन सोहळयास उपस्थिती व दुपारी २ वाजता मोटारीने मेहकरकडे प्रयाण करतील.












