20.9 C
New York
Tuesday, September 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

शिंदी येथील जिल्हा परिषद शाळेसाठी डॉ निलेश गावंडे सरसावले ‘ शाळेसाठी अद्यावत सुविधेसाठी १० हजाराची मदत जाहीर

बुलढाणा/सचिन खंडारे

सिंदखेड राजा तालुक्यातील आदर्श शाळा असलेल्या शिंदी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये अनेक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे ‘ विद्यार्थी एका बाजूला अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये बाजी मारताना दिसत असून ‘ मुलांना अद्यावत सुविधा मिळावी यासाठी प्राध्यापक नारायण गावंडे विज्ञान आशालाता गावंडे वाणिज्य व स्वर्गीय भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ निलेश गावंडे यांनी सुद्धा पुढाकार घेतला असून शाळेतील भिंतींना रंग रंगोटी बोलक्या भिंती त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचे व्यवस्था करण्यासाठी पाण्याची टाकी ‘ ज्या अद्यावत सुविधा मिळाव्यात म्हणून दहा हजार रुपयांचे आर्थिक मदत जाहीर केली आहे ‘ एका बाजूला जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र गुणवंत असलेल्या शाळेला आर्थिक मदतीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे ‘
शिंदी येथील शाळेचे तीन वर्ग खोल्या तीन पत्रे याला गंज चढल्यामुळे गळत आहे ‘ त्याचबरोबर मुलांना शौचालयाची व्यवस्था सुद्धा नाही , सदर याकरता शिंदी येथील गावकऱ्यांनी लोक वर्गणी सुरू केली असून यामध्ये डॉ . निलेश गावंडे यांचा मोलाचा वाटा मिळणार आहे ‘ त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल शाळा समितीच्या वतीने त्यांचे आभार मानले आहेत .

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in