पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम राबवलं. याअंतर्गत भारतीय वायूदलाने लढाऊ विमानांद्वारे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर बॉम्बवर्षाव केला. यामध्ये पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त झाले. मात्र, या हल्ल्याला पाकिस्तानी वायू दलाने जशास तसं प्रत्युत्तर देत भारताचं राफेल हे लढाऊ विमान पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. हा दावा आता राफेल विमान बनवणारी फ्रेंच कंपनी दसॉल्ट एव्हिएशनने फेटाळून लावला आहे.












