Maharashtra Constable Sacked: पोलीस खात्यात नोकरी मिळविण्यासाठी आरक्षित गटातील बोगस प्रमाणपत्र सादर केल्याबद्दल एका पोलीस शिपायावर कारवाई करण्यात आली असून त्यांना नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले आहे. सरकारी प्रकल्पग्रस्त असल्याचे दाखवून या व्यक्तीने पोलीस दलात नोकरी मिळवली होती. नायगाव स्थानिक शस्त्रास्त्र विभागात काम करणाऱ्या शेख यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे, अशी बातमी द इंडियन एक्सप्रेसने दिली आहे.












