आधीच महागाईच्या झळा सोसत असलेल्या सामान्य जनतेला आता आणखी एका मोठ्या धक्क्याचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता व्यक्त होत आहे, आणि त्यामुळे देशांतर्गत इंधन दरांमध्ये प्रचंड वाढ होण्याचा धोका निर्माण झाला आहे.












