गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला इराण-इस्रायल यांच्यातील लष्करी संघर्ष आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांनी इराणवर हल्ला करण्याचे संकेत दिले होते. यावर आता रशियाने अमेरिकेला कडक इशारा दिला असून, इराणविरुद्धच्या लष्करी कारवाईत इस्रायलला पाठिंबा देऊ नये, असे सांगितले आहे.
रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्गेई रियाबकोव्ह नुकतेच म्हणाले की, जर अमेरिकेने इस्रायलला थेट लष्करी मदत दिली, तर मध्य पूर्वेतील परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. अशा मदतीचा विचार करणेही धोकादायक ठरू शकते, असे त्यांनी सांगितले.
“हे असे पाऊल असेल, जे संपूर्ण परिस्थिती पूर्णपणे अस्थिर करेल,” असे रियाबकोव्ह यांनी रशियन वृत्तसंस्था इंटरफॅक्सला सांगितले. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, रशिया आणि अमेरिका संपर्कात असून, इराण-इस्रायल संघर्षाबाबत चर्चा सुरू आहे.












