Russia Warns US Over Attack On Iran: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला इराण-इस्रायल यांच्यातील लष्करी संघर्ष आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांनी इराणवर हल्ला करण्याचे संकेत दिले होते. यावर आता रशियाने अमेरिकेला कडक इशारा दिला असून, इराणविरुद्धच्या लष्करी कारवाईत इस्रायलला पाठिंबा देऊ नये, असे सांगितले आहे.












