5.6 C
New York
Thursday, December 4, 2025

Buy now

spot_img
spot_img

शेतकऱ्याच्या जिद्दीला सलाम! बँकेची नोकरी सोडून उभारला १०० कोटींचा ऑरगॅनिक फार्मिंगचा व्यवसाय

छंद किंवा आवडीचे व्यवसायात रूपांतर करावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण, घर चालवण्यासाठी किंवा अगदी पोटा-पाण्यासाठी अनेकांना नोकरी ही करावीच लागते. त्यामुळे काही जण व्यवसाय करताना नोकरी करून आवड व गरज दोन्ही पूर्ण करत असतात. तर आज आपण अशीच एक गोष्ट जाणून घेणार आहोत; ज्याने एकेकाळी पॉलिसी विकण्याचे काम केले आणि आज त्यानेच १०० कोटी रुपयांचा व्यवसाय उभारला आहे.

पंजाबमधील लुधियाना येथील शेतकरी बिक्रमजीत सिंग याला सेंद्रिय शेती करायची होती. शेतीसारख्या पारंपारिक क्षेत्रातही स्मार्ट नियोजन नियोजन केल्यावर कसे यश मिळते ही बिक्रमजीतची कहाणी आज आपल्याला सांगणार आहे. बिक्रमजीत यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात शेतकरी म्हणून केली नव्हती. २००५ मध्ये पदवी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी विमा क्षेत्रात काम केलं. पण, त्याचबरोबर ते एका लहान शेतीचेही देखरेख करत होते.

नंतर २०१० मध्ये त्यांनी वैद्यकीय पदवी मिळवली आणि काही काळ बँकिंग क्षेत्रात काम सुद्धा केले. पण, १०१४ मध्ये त्यांनी पूर्णपणे शेतीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला बिक्रमजीतने डाळिंबाची लागवड केली. पण, त्याला पाहिजे तितके यश मिळाले नाही. मग त्याने लिंबूची लागवड केली. तेव्हा हा प्रयत्न त्याचा यशस्वी ठरला.

त्यानंतर शेतीचा विस्तार करण्यासाठी, बिक्रमजीतने २०० एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतली. यापैकी त्यांनी १०० एकरवर फळबागा लावल्या आणि उर्वरित अर्ध्या जागेचा वापर गहू, बासमती तांदूळ, मका, ऊस आणि भाज्या यांसारख्य पिकांची लागवड करण्यासाठी केला. त्यांनतर त्याने कंत्राटी शेती देखील सुरू केली, ज्यामुळे त्यांना अधिक शेतकऱ्यांशी जोडण्यास आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्यास मदत झाली.

मग सेंद्रिय शेतीवर विश्वास ठेवून, बिक्रमजीतने ‘हेल्दी अर्थ’ नावाचा स्वतःचा ब्रँड सुरू केला. या ब्रँड अंतर्गत २१६ हून अधिक सेंद्रिय उत्पादने विकली जातात. त्यांनी नंतर सेंद्रिय अन्न रेस्टॉरंट्स देखील उघडले. ‘हेल्दी अर्थ’ ब्रँडद्वारे दिल्या जाणाऱ्या मुख्य पदार्थांपैकी एक म्हणजे नाचणी. नाचणीएक अत्यंत पौष्टिक धान्य आहे. बिक्रमजीतचे उद्दिष्ट केवळ व्यवसाय वाढवणे नव्हे तर तरुणांना परदेशात न जाता भारतात राहून त्यांचे भविष्य घडवण्यास प्रोत्साहित करणे असे होते.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in