बदलापूरः बदलापूर रेल्वे स्थानकात गर्दी नियंत्रण आणि सुविधा उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमुळे प्रवाशांना दिलासा मिळताना दिसत नाही. मात्र अपुऱ्या आणि संथगतीच्या कामांमुळे प्रवाशांचे हाल कायम आहेत. सध्या पावसामुळे प्रवाशांना फलाट क्रमांक एक आणि दोन वर भिजतच उभे राहावे लागते आहे. काही ठिकाणी छप्पर असूनही ते अपुरे असल्याने एकतर पावसापासून रक्षण किंवा लोकलमध्ये जागा अशी काहीशी बदलापुरकर प्रवाशांची स्थिती आहे. तर स्थानकाबाहेरही पूर्व भागात पाणी साचत असल्याने प्रवाशांना कसरत करत स्थानक गाठावे लागते आहे. त्यामुळे प्रवाशांत संतापाचे वातावरण आहे.












