3.4 C
New York
Monday, December 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत सिंगापूर एअरलाइन्सने मौन का बाळगलंय? प्रफुल्ल पटेलांचा सवाल; एअर इंडियाशी संबंध काय?

माजी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेवरील सिंगापूर एअरलायन्सच्या मौनाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. पटेल यांनी याबाबत एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान कार्यालय, नागरी उड्डाण मंत्री के. आर. नायडू व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना टॅग करून सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. पटेल यांनी म्हटलं आहे की “एअर इंडियामधील महत्त्वपूर्ण शेअरधारकाची भूमिका आणि इतक्या मोठ्या दुर्घटनेवरील त्यांचं मौन आश्चर्यकारक आहे”. यावेळी पटेल यांनी एअर इंडिया व सिंगापूर एअरलाइन्स यांच्यातील ‘संवेदनशील करारा’चाही उल्लेख केला.

एअर इंडियाचं बोइंग ड्रीमलायनर ७८७-८ ड्रीमलायनर विमान गेल्या आठवड्यात, १२ जून रोजी दुपारी १.३८ वाजता अहमदाबादमधील मेघानीनगरमध्ये कोसळलं. या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह विमानातील २२९ प्रवासी आणि १२ क्रू सदस्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच विमान रहिवासी भागात कोसळल्यामुळे या दुर्घटनेत मेघानीनगरमधील ३३ रहिवासी मृत्यूमुखी पडले आहेत. या दुर्घटनेत विमानातील केवळ एक प्रवासी बचावला आहे.

उच्चस्तरीय चौकशी समिती गठित

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) व एअर इंडियामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय सुरक्षा समिती आणि केंद्र सरकारने नेमलेली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. गृह सचिवांच्या अध्यक्षतेखालील ही समिती पुढील तीन महिने या घटनेचा तपास करून त्यांचा अहवाल सादर करेल.

प्रफुल्ल पटेलांची सिंगापूर एअरलाइन्सवर नाराजी

दरम्यान, केंद्रातील एनडीए सरकारमधील सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रफुल पटेल यांनी सिंगापूर एअरलाइन्सच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबाबत टिप्पणी केली आहे. ते म्हणाले, “अहमदाबादमधील विमान दुर्घटनेला सात दिवस उलटले तरी सिंगापूर एअरलाइन्सकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया अथवा निवेदन आलेलं नाही. कदाचित ते लोक या दुर्घटनेकडे दुर्लक्ष करत असावेत. एअर इंडियाच्या ताफ्यातील मोठ्या विमानांच्या देखभालीची जबाबदारी सिंगापूर एअरलाइन्सकडेच आहे. यामध्ये ड्रीमलायनरचाही समावेश आहे. मात्र, आता ते (सिंगापूर एअरलाइन्स) लपून बसले आहेत”.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in