Reddit Post एका २२ वर्षीय तरुणीने रेडइट वर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. एका मुलाशी तिचं लग्न ठरलं. त्यानंतर त्याचं सोशल मीडिया तिने तपासलं. यानंतर तिला ज्या गोष्टी लक्षात आल्या त्यामुळे तिला धक्का बसला. त्याच सगळ्याबाबत ही पोस्ट आहे. माझ्या घरातले मुलगा चांगला आहे त्याच्याशी लग्न कर म्हणून तगादा लावत होते. पण मी कशी वाचले ते मलाच ठाऊक आहे असंही या मुलीने म्हटलं.
काय आहे २२ वर्षीय तरुणीची पोस्ट?
हे नाव देऊन या मुलीने आपली पोस्ट शेअर केली आहे.”माझं एका मुलाशी लग्न ठरलं होतं. त्याचा सोशल मीडिया मी तपासला. मला हे समजलं की लग्न ठरलेले तरुण किती वेल प्लेस्ड असतात. शिवाय ज्याच्याशी लग्न ठरलं आहे तो माणूस कसा आहे हेदेखील मला कळलं. ज्याच्याशी माझं लग्न ठरलं तो तरुण समोर आला की आदरपूर्वक वागत होता. त्याची नोकरीही चांगली होती. मात्र खासगीत तो भवनिकदृष्ट्या अस्थिर, न्यूड फोटो पाठवणारा, एखाद्या नराधमासारखा, अनेकदा सगळं नियंत्रण स्वतःकडे ठेवू पाहणारा, विचित्र वागणारा होता.
या तरुणीने डिजिटल चेक कसा ठेवला तेही सांगितलं
मी माझ्या मैत्रिणीच्या सोशल मीडिया आयडीवरुन त्याच्याशी बोलत होते. त्यावेळी मला या सगळ्या गोष्टी समजल्या. त्याने मला काही मॉर्फ केलेले न्यूड फोटो पाठवले, शिवाय पॉर्न बघूया का मी तर पाहतो असं विचारत होता. पॉर्न पाहणं काही गैर नाही त्यात काही चुकीचं नाही असं तो मला समजावत होता. मी माझ्या पोस्टमधून लग्न ठरलेल्या प्रत्येक मुलीला सांगते आहे की माझ्याप्रमाणे तुम्हीही डिजिटल चेक ठेवा. मुलगा चांगला दिसतो आहे, त्याचं कुटुंब चांगलं आहे यावर भाळू नका. तो खासगीत कसा वागतो आहे, सोशल मीडियावर कसा वागतोय हे लक्षात घ्या. शेवटी वरवर चांगलं वागणारा माणूस त्याच्या अंतरंगात कसा वागतो हे महत्त्वाचं. तो चुकीचं वागत होता त्यामुळे मी तर त्याला ब्लॉक केलं. तसंच माझ्या कुटुंबालाही ही सगळी कल्पना दिली. अशा लग्नांच्या बाबतीत फसवणूक होणं सोपं असतं. त्यामुळे मुलींनो सावध व्हा.” या आशयाची पोस्ट या तरुणीने लिहिली आहे. ज्यावर आता विविध कमेंट येत आहेत.
सोशल मीडियावर विविध कमेंट आणि सल्ले
एखादा माणूस कसा आहे हे जाणून घेण्यासाठी तू फ्रिलान्स सायबर सिक्युरिटी एक्स्पर्टलाही गाठू शकतेस. तो तुला आणखी माहिती देऊ शकतो. या सगळ्या गोष्टी खोलवर जाणून घेऊ शकतो. दुसऱ्या एका युजरने म्हटलंय की माझ्या एका मैत्रिणीने अशाच स्वभावाच्या पुरुषाशी लग्न केलं. तिच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस नरकाप्रमाणे होता. तिच्या कुटुंबालाही लग्नानंतर सगळं समजलं होतं. पण प्रत्येकाने शांत राहणं पसंत केलं. कुणीही तिला कायदेशीर रित्या वाचवायलाही आलं नाही. त्यामुळे तू जे केलंस ते योग्यच आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.












