नागपूर : एक ऐतहासिक पाऊल टाकत १५ ऑगस्ट २०२५ पासून ३ हजार रुपये किमतीचा फास्टटॅग आधारित वार्षिक पास सुरू करण्यात येणार आहे. हा पास सुरू होण्याच्या तारखेपासन एक वर्षापर्यंत किंवा २०० यात्रा यापैकी जे पहिले असेल तोपर्यंत तो वैध राहणार आहे.
हा पास केवळ गैर व्यावसायिक खासगी वाहने (कार-जीप-व्हॅन आदी) यासाठी विशेष रुपात तयार करण्यात आला आहे. तो देशभरातील राष्ट्रीय महामार्गवर तो चालणार आहे. वाषिक पाससाठी लवकरच महामार्ग ॲप आणि एनएचआच्या संकेतस्थळावर एक स्वतत्र लिंक उपलब्ध केली जाणर आहे. ज्यामुळे पास उपलब्धता अधिक सुलभ होणार आहे.












