आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अत्यंत आवश्यक असलेले ओळखपत्र आहे. या महत्त्वाच्या दस्तऐवजामध्ये व्यक्तीचे नाव, पत्ता, वय लिंग आणि व्यवसाय यासंबंधित माहिती असते. आधार कार्ड हा भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे असे मानले जाते. आधार हा UIDAI द्वारे भारतीय रहिवाशांना जारी केलेला १२-अंकी ओळख क्रमांक आहे. हा आधार क्रमांक, ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून काम करतो आणि विविध सरकारी आणि गैर-सरकारी सेवांसाठी वापरला जातो.
या दस्तऐवजामुळे नागरिकांना विविध प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ घेणे शक्य होते. शिवाय पेंशन योजना, बँक खाते, डिजिटल नोंदणी अशा अनेक सुविधा मिळतात. जर एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड नसेल तर त्याला शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेता येणार नाही, ती व्यक्ती या योजनांपासून वंचित राहू शकतात.












