अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातात २६५ पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर केंद्र सरकार अलर्ट झालं असून पुन्हा अशा स्वरुपाच्या घटना घडू नये, यासाठी आता पावलं उचलले जात आहेत. या पार्श्वभूमीवरच आता डीजीसीएने महत्वाचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. डीजीसीएच्या आदेशानुसार आता बोईंग ७८७ ड्रीमलायनर या विमानांची उड्डाणापूर्वी संपूर्ण सुरक्षा तपासणी अनिवार्य करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.












