-0.6 C
New York
Saturday, December 6, 2025

Buy now

spot_img
spot_img

दारूड्या आयशर ट्रकचालकाने एसटी बसला ठोकारले; दोन प्रवासी जागीच ठार, २4 प्रवासी जखमी*

*दारूड्या आयशर ट्रकचालकाने एसटी बसला ठोकारले; दोन प्रवासी जागीच ठार, २4 प्रवासी जखमी*

*नाव्हा – सिंदखेडराजा रोडवरील दुपारची भीषण दुर्घटना; जखमींवर जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू*!

सिंदखेडराजा तहसीलदार अजित दिवटे यांची तत्परता जखमींना तातडीने केले दवाखान्यात भरती .

बुलढाणा सचिन खंडारे

दारूच्या नशेत असलेल्या आयशर ट्रकच्या वाहनचालकाने आपले वाहन निष्काळजीपणे व भरधाव चालवून जालना ते सिंदखेडराजा रोडवर नाव्हानजीक एसटी बसला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एसटी बसमधील दोन प्रवासी जागीच ठार झाले असून, बसमधील 24 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच जालना व सिंदखेडराजा पोलिसांनी व सिंदखेडराजा तहसीलदार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत व बचावकार्य केले. तसेच, जखमींना तातडीने जालना व सिंदखेडराजा येथील रूग्णालयात हलवले आहे. एसटी बस ही छत्रपती संभाजीनगरहून माहूरगडला जात होती. अपघातात दोन्हीही वाहने चक्काचूर झाली आहेत.

जालना ते सिंदखेडराजा रोडवरील नाव्हा येथे एसटी महामंडळाच्या मालेगाव ते माहूरगड एम एच 14 बी टी 4276 या बसला हा अपघात झाला. आयशर ट्रक क्रमांक एम एच 13 AX2682
आणि ही बस समोरासमोर धडकली. आज (दि.१४) दुपारच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता, की या अपघातामध्ये एसटी बसमधील 1 वैभव अशोक शेरकर राहणार सिंदखेड राजा 2 पुरुषोत्तम पाटीलबा बाहेकर वय 66 राहणार एकतानगर मेहकर प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर जवळपास २4 प्रवासी जखमी झाले त्यांना उपचारासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे उपचारासाठी साठी भरती करण्यात आलेल्यांची नावे
1मोहन दगडु राठोड वय 65
2 सोमेश्वर भगवानराव बरकत वय 45
3 यमुना उत्तम राठोड
वय 75
4चंदा प्रकाश शिरसाट वय 50
5 भिवसन दवलन बोरकर
वय 53
6 पल्लवी राहुल वाघमारे
वय 21
7 अनुराग सुरेश वाहकराव वय 20
8 विमल बाबुराव जाधव वय 60
9 कमल परसराम जाधव वय 70
10 कसतुरा मोहन राठोड वय 70
11विलास नामदेव राठोड वय 50
12सिद्धार्थ नंदा जावरे वर 60
13श्रीकृष्णा तुकाराम
जुंबड वय 65
14दिलिप नायबराव
जाधव
15कांताबाई
महादेव इंगळे वय 45
16वैशाली
लक्ष्मण जोगदंडे वय 45
17 हरिश्चंद्र रामलाल डोंगरे वय 65
18समशर शकिल खान वय 40
19आरशिया शकिल खान वय 17
20अरिया शकिल खान वय 12
21 विनोद जनार्धन देशमुख वय 58
22विजय एकनाथ आव्हाड वय 41
23ननव राजु बेनिवाल वय60
24 छोटु हिरा बेनिवाल
वय 60
आहेत. अपघातात बसचा वाहक गंभीर जखमी झाला असून, बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघातग्रस्त एसटी बस जालन्याकडून बुलढाण्याच्या दिशेने जात होती. तर आयशर ट्रक हा सिंदखेडराजावरून जालनाच्या दिशेने येत होता. अपघाताची माहिती मिळताच जालना व सिंदखेडराजा पोलिसांनी व सिंदखेडराजा तहसीलदार अजित दिवटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ नजीकच्या शासकीय रूग्णालयामध्ये दाखल केले. तर गंभीर जखमींना जालना येथे हलविण्यात आले होते.
—-
दरम्यान, आयशर ट्रकचा चालक हा आपले वाहन भरधाव चालवत होता. तसेच, तो दारूपिऊन वाहन चालवित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातग्रस्त बस छत्रपती संभाजीनगरहून माहूरगडकडे जात होती. तर, आयशर ट्रक हा सिंदखेडराजावरून जालनाच्या दिशेने जात होता. या अपघातात एसटी महामंडळाच्या बसचा समोरील भागाचा अक्षरश: चेंदामेदा झाला. जखमींना जवळच्या रूग्णालयात तसेच काहींना जालना येथे हलविण्यात आले असून, अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.वृत लिहेप्रयत्न गुन्हा दाखल झाला नव्हता
Box

*सदर घटनेची माहिती मिळताच सिंदखेड राजाचे तहसीलदार श्री अजित दिवटे हे आपल्या महसूल* *कर्मचारी तलाठी दराडे यांना घेऊन घटनास्थळी लगेच पोहोचले व जखमींना मदत करण्यासाठी सरसावले. तसेच त्यानी जखमी रुग्णांना शासकीय रुग्णालय जालना येथे हॉस्पिटलला त्वरित पाठवण्याची व्यवस्था केली. तसेच* *रस्त्यावरील वाहने बाजूला करण्यासाठी त्यांनी सावरगाव माळ येथील क्रेन मशीन ही मागवली व रस्त्यावरील अडथळा दूर केला. त्यामुळे* *अधिकाऱ्यांमधील असाही माणुसकीचा गुण दिसून आला.*

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in