जिजाऊंना वंदन व वडिलांचे स्मरण
मनोज कायंदे यांनी घेतली पद,गोपनीयतेची शपथ
बुलढाणा सचिन खंडारे
मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार मनोज कायदे यांनी (ता.८ डिसेंबर रोजी आमदार म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली.
विधानसभेच्या विशेष अधिवेशनात शपथ घेताना आमदार मनोज कायंदे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ,संत चोखामेळा,व फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करून वडील स्वर्गीय देवानंद कायंदे यांचे स्मरण केले. पद व गोपनीयतेची शपथ घेताना त्यांनी मी मनोज नंदाताई देवानंद कायंदे असा नाम उल्लेख करून आपल्या मातोश्री नंदाताई कायंदे यांचाही सन्मान केला. विधानसभेत शपथविधी प्रसंगी विधानसभेच्या गॅलरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.नाझेर काझी,त्यांचे मोठे बंधू सतीश कायंदे यांच्यासह कार्यकर्ते हजर होते.












