वाशिम (दि.०८,सप्टेंबर): आदिवासी भा
गांमध्ये ‘शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी’ आणि ‘प्रतिक्रियाशील शासन’ घडवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘आदी कर्मयोगी – प्रतिक्रियाशील सुशासन कार्यक्रम’ या अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात तीन दिवसीय कार्यशाळेचा दि.सप्टेंबर,२०२५ रोजी शुभारंभ झाला.
या कार्यशाळेचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी श्री. ब्रिजेश पाटील यांच्या हस्ते झाले, तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. किरण कोवे यांनी मार्गदर्शन केले. भारत सरकारच्या जनजातीय कार्य मंत्रालयाच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या अभियानाचे उद्दिष्ट सेवा, समर्पण आणि संकल्प या तत्त्वांवर आधारित 20 लाख बांधील परिवर्तनशील नेत्यांचा समूह तयार करणे आहे.
‘आपला गाव – समृद्धीचे स्वप्न’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमांतर्गत गावपातळीवर व्हिजन बिल्डिंग करण्यावर भर दिला जाणार आहे. यावेळी आदिवासी विभागाचे श्री. दुर्योधन दांडगे व श्री. एस.बी. देशमुख, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे श्री. शुभम ढोके, आरोग्य विभागाचे श्री. स्वप्निल चव्हाण, महिला व बालकल्याण विभागाचे श्री. अनुप कदम आणि वन विभागाचे श्री. काळे यांनी विषय तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन केले.
या तीन दिवसांच्या कार्यशाळेत आरोग्य, महिला व बालकल्याण, शिक्षण, ग्रामविकास, कृषी व ग्रामीण पाणीपुरवठा अशा विविध विभागांतील निवडक अधिकारी व कर्मचारी तालुकास्तरीय प्रशिक्षक म्हणून सहभागी झाले. ‘संपूर्ण सरकार दृष्टिकोन’ (Whole-of-Government Approach) या तत्त्वावर आधारित या कार्यक्रमातून सर्व विभागांचे समन्वय साधून आदिवासी विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे.












