भारतीय नर्स निमिषा प्रियाला १६ जुलै रोजी येमेनमध्ये दिली जाणारी फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत नर्स निमिषा प्रियाला काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हे प्रकरण अतिशय संवेदनशील असून भारतीय अधिकारी स्थानिक तुरुंग अधिकाऱ्यांशी आणि अभियोक्ता कार्यालयाशी नियमित संपर्कात असल्यामुळे ही शिक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणात सुरुवातीपासूनच भारत सरकारकडून मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. निमिषा प्रियाच्या कुटुंबाला दुसऱ्या पक्षाशी परस्पर सहमतीने तोडगा काढण्यासाठी काही वेळ मिळावा यासाठी ठोस प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.












