-0.6 C
New York
Saturday, December 6, 2025

Buy now

spot_img
spot_img

खबर पीक पाण्याची : डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या खिशात पैसा खळखळणार ?

राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या निर्णयामुळे नाही तर चक्क अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशातील मका आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खिशात पैसा खळखळणार आहे. हा निर्णय एका अर्थाने जगभरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गत दोन वर्षांपासून सोयाबीनला उत्पादन खर्चापेक्षा कमी, हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. सोयाबीन कवडीमोल किंमतीने विकावे लागत आहे. परिणामी यंदा सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता आहे, अशी अत्यंत अडचणीच्या काळात ट्रम्प यांचा निर्णय विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.

अमेरिकेच्या अध्यक्षांचा महत्त्वाचा निर्णय

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच रिन्यूएबल फ्युएल स्टडर्ड २००५ धोरणानुसार जैवइंधनाच्या उत्पादन आणि वापराला प्रोत्साहन देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेत यापूर्वीच मका, सोयाबीन, पामतेल आणि कृषी अवशेषांच्या वापरातून जैवइंधन निर्माण केले जाते. आता उत्पादनात आणखी वाढ करण्यासह पेट्रोलियम कंपन्यांना खनिज तेलात बायोइंधनाचे मिश्रण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार सध्या अमेरिकेत बायोइंधनाचे उत्पादन २२.२३ अब्ज गॅलन (१ गॅलन – ३.७८५ लिटर) इतके आहे, ते २०२६ मध्ये २४.०२ अब्ज गॅलन आणि २०२७ पर्यंत २४.४६ अब्ज गॅलन इतके वाढविण्याचे उद्दिष्टे आहे.

ट्रम्प यांच्या निर्णयाचा व्यापक परिणाम शक्य

इंटरनॅशनल ग्रेन कॉन्सिलच्या माहितीनुसार, २०२३-२४ मध्ये जागतिक मका उत्पादन सुमारे १.२३ अब्ज टन आहे. त्यात अमेरिकेचा वाटा ३२ टक्के, म्हणजे सुमारे ३,८२० लाख टन आहे. जागतिक मका उत्पादनात भारत सहाव्या क्रमांकावर असून, देशाचे उत्पादन ३४३ लाख टन असून, ते जागतिक उत्पादनाच्या २.८ टक्के आहे. जागतिक सोयाबीन उत्पादन सुमारे ४२०७ लाख टन आहे. त्यात अमेरिकाचा वाटा ११८८.३६ लाख टन, म्हणजे २८.५ टक्के आहे. अमेरिका ब्राझील नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक आहे. भारताचे सरासरी सोयाबीन उत्पादन १२५ लाख टन असून, ते जागतिक उत्पादनाच्या जेमतेम ३ टक्के आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या व्यापार धोरणांमुळे चीनने अमेरिकेतून सोयाबीन आयात बंद केली आहे. शिवाय जागतिक पातळीवर सोयाबीनचे उत्पादन चांगले असल्यामुळे आणि पामतेल, सूर्यफूल तेलाची उपलब्धता चांगली असल्यामुळे सोयाबीन आणि सोयाबीन तेलाच्या किंमतीत मोठी पडझड झाली आहे.

विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मक्यापासून इथेनॉल निर्मितीला चालना दिल्यामुळे देशात मक्याची लागवड कित्येक पटीने वाढली आहे. पण, इथेनॉल आणि पशूखाद्यासाठी मक्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे दरातील तेजी कायम आहे. मात्र, सोयाबीनच्या बाबत असे घडले नाही. जागतिक उत्पादनात प्रचंड वाढ झाल्यामुळे देशात अत्यंत स्वस्तात सोयाबीन तेलाची आवक होऊ लागली. त्यामुळे देशातील सोयाबीन रिफायनरींमध्ये सोयाबीनचे गाळप बंद झाले. फक्त आलेले कच्चे सोयाबीन तेल रिफाईंड करून नव्याने पॅकिंग करून विकले गेले किंवा आलेले रिफाईंड सोयाबीन तेल पँकिंग करून विकले गेले. त्यामुळे देशातील सोयाबीन गोदामांमध्ये पडून आहे. अभ्यासकांच्या मागील हंगामातील सुमारे १११ लाख टन सोयाबीनपैकी ६० लाख टनांहून जास्त सोयाबीन गोदामांत आहे. त्यामुळे यंदा सोयाबीनच्या लागवडीत घट होण्याचा अंदाज आहे.

अमेरिकेच्या दबाबामुळे भारत – अमेरिका मुक्त व्यापार कराराच्या अंतर्गत अमेरिकेने भारतावर सोयाबीन आयात करण्यासाठी दबाव वाढविला आहे. अमेरिकेचे सोयाबीन जीएम (जणुकीय सुधारीत) असल्यामुळे ते आयात करू नये आणि आयात झाल्या देशात उत्पादीत होणारे सोयाबीन कवडीमोल होईल, अशी भीती शेतकरी संघटना व्यक्त करीत आहेत. गत हंगामात केंद्र सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदी करूनही बाजारात सोयाबीनचे दर वाढले नव्हते. त्यामुळे यंदा आणखी बिकट स्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. पण, अमेरिकेच्या धोरणामुळे जागतिक बाजारात सोयाबीनच्या दरात तेजीचे संकेत मिळत आहेत. त्याचा फायदा देशातील म्हणजे प्रामुख्याने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in