1.8 C
New York
Tuesday, December 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

आवक वाढल्याने लसूण, घेवडा, शेवग्याच्या दरात घट

पुणे : मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आवक वाढल्याने लसूण, घेवडा, शेवग्याच्या दरात घट झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून मिळून ११० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक वाढली. कर्नाटक, गुजरातमधून मिळून ४ ते ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून मिळून ४ ते ५ टेम्पो शेवगा, हिमाचल प्रदेशातून २ टेम्पो मटार, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून २ टेम्पो तोतापुरी कैरी, गुजरात आणि मध्य प्रदेशातून १० ते १२ टेम्पो लसूण अशी आवक झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून सातारी आले ५०० ते ६०० गोणी, भेंडी ६ ते ७ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, काकडी ६ ते ७ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लाॅवर ७ ते ८ टेम्पो, भुईमूग शेंग १०० ते १२५ गोणी, तांबडा भोपळा १४ ते १५ टेम्पो, कांदा ७० ते ८० ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ३५ ते ४० ट्रक बटाट्याची आवक झाली.

पालेभाज्यांच्या दरात घट

गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक वाढली. आवक वाढल्याने सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या दरात घट झाली. कोथिंबिर, मेथी, कांदापातीसह सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी घट झाली, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरीच्या दीड लाख जुडींची, तसेच मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली. पालेेभाज्यांचे शेकड्यातील दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर – ५०० ते १०००, मेथी – १००० ते १२००, शेपू – ५०० ते ८००, कांदापात – ८०० ते १२००, चाकवत – ४०० ते ७००, करडई – ३०० ते ७००, पुदिना – ३०० ते ५००, अंबाडी – ३०० ते ६००, मुळे – ८०० ते १२००, राजगिरा – ४०० ते ७००, चुका – ५०० ते ८००, चवळई – ३०० ते ६००, पालक -८०० ते १२००

अननस, पपई, डाळिंब, माेसंबी महाग

मागणी वाढल्याने अननस,पपई, डाळिंब, मोसंबीच्या दरात वाढ झाली आहे. अन्य फळांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक फळबाजारात मोसंबी ३० ते ४० टन, संत्री एक टन, डाळिंब ४५ ते ५० टन, पपई ५० ते ६० टेम्पो, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड ४ ते ५ टेम्पो, खरबूज ४ ते ५ टेम्पो, चिकू २०० खोकी, पेरू ४०० ते ५०० प्लास्टिक जाळी (क्रेट्स), सीताफळ ७ ते ८ टन, तसेच केरळहून ४ ट्रक अननस, तसेच जांभूळ ८ ते १० टेम्पो अशी आवक झाली.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in