हरियाणाची टेनिसपटू राधिका यादवची गुरुग्राममील राहत्या घरी वडिलांनीच गोळ्या घालून हत्या केल्यानंतर आता दोन दिवसांनी कुटुंबियांची प्रतिक्रिया समोर आली आहे. तसेच आरोपी वडील दीपक यादव यांनी कथितपणे हत्येबद्दल पश्चातापही व्यक्त केला आहे. दीपक यादव यांचे मोठे बंधू विजय यादव (५४) यांनी द इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधला असून सदर घटनेचा निषेध केला. “आरोपी दीपक यादव यांना पश्चाताप होत असून त्यांनी फाशी मिळावी, असा FIR लिहिण्याची पोलिसांना विनंती केल्याचे”, ते म्हणाले.












