-4.2 C
New York
Friday, December 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

सोनू निगमने ‘दिल पे चलाई छुरियाँ’ गाणाऱ्या राजूबरोबर बनवली रील; नेटकरी म्हणाले…

आजकाल सोशल मीडियावर एक गाणे खूप वेगाने व्हायरल होत आहे. प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या रीलवर स्क्रोल केल्यानंतर पुढच्या रीलमध्ये तेच गाणे ऐकू येते. केवळ सोशल मीडिया वापरकर्तेच नाही तर अनेक सेलिब्रिटीदेखील या गाण्यावर रील बनवत आहेत.

आम्ही ज्या गाण्याबद्दल बोलत आहोत त्याचे नाव ‘दिल पे चलाई छुरियाँ’ हे आहे. एका व्यक्तीने दगडाचे दोन तुटलेले तुकडे वाजवून हे गाणे गायले आणि त्याचे गाणे इतके वेगाने व्हायरल झाले की तो रातोरात स्टार बनला. आम्ही त्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत ज्याचे नाव राजू कलाकार आहे. राजू कलाकार आता बॉलीवूड गायक सोनू निगमबरोबर गाणे गाताना दिसत आहे, चला तुम्हाला त्याचा व्हिडीओ दाखवतो.

सोनू निगमबरोबरचा राजूचा व्हिडीओ व्हायरल

राजू कलाकाराला आता कोणत्याही ओळखीची गरज नाही, त्याने दगडाचे दोन तुटलेले तुकडे वाजवून ‘दिल पे चलाई छुरियाँ’ हे गाणे गाऊन देशभरात आपली ओळख निर्माण केली आहे, राजू कलाकाराचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. त्याच्या व्हिडीओला १८३ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. राजू कलाकार एका रात्रीत प्रसिद्ध झाला, इतकेच नाही तर तो मोठ्या बॉलीवूड पार्ट्यांमध्येही दिसू लागला आहे. राजू कलाकार त्याच्या सोशल मीडिया हँडलवर सर्व व्हिडीओ शेअर करत आहे आणि आता राजू कलाकाराचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये राजू कलाकार गायक सोनू निगमबरोबर दिसत आहे. राजू कलाकार सोनू निगमबरोबर ‘दिल पे चलाई छुरियाँ’ हे गाणे गातोय, लोकांना सोनू निगम आणि राजू कलाकाराची जुगलबंदी खूप आवडते, सोनू निगम राजू कलाकाराच्या गाण्याचा खूप आनंद घेत आहे. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सनम बेवफा’ या चित्रपटातील हे गाणं आहे.

दगडाचे दोन तुटलेले तुकडे वाजवून राजू कलाकाराने गायलेल्या ‘दिल पे चलाई छुरियाँ’ या गाण्याला सोनू निगमने मूळ आवाज दिला आहे. हा व्हिडीओ टी-सीरिजच्या भागीदारीत बनवण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओच्या माध्यमातून लवकरच या गाण्याचं नवं व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला येईल, अशी हिंट सोनू निगमने दिली आहे.

हा व्हिडीओ शेअर करत त्याला कॅप्शनदेखील दिलं आहे. “यापूर्वी कधीही असं ऐकलेलं नसेल असं ऐकण्यासाठी सज्ज व्हा, येत्या सोमवारी काहीतरी खास होणार आहे.” सोनू निगम आणि राजू कलाकार यांच्या व्हिडीओवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत, चाहते सोनू निगमचे खूप कौतुक करत आहेत. एका वापरकर्त्याने कमेंट केली, “सोनू एक दिग्गज आहे.” दुसऱ्याने लिहिले, “अरे व्वा सोनू निगम सरांबरोबर.” त्याचप्रमाणे, वापरकर्ते व्हिडीओवर खूप प्रेम करत आहेत.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in