गेल्या काही दिवासांत कोलकात्यात अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी आर जी कर महाविद्यालय आणि रुग्णालयातील एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना ९ ऑगस्ट २०२४ रोजी घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरला होता. त्यानंतर कोलकातामधील एका लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता कोलकाता येथील एका प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्याने बॉइज हॉस्टेलमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे.












