विद्या बालन बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आजवर तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. विद्याने आजवर कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्यास पसंती दिलेली तिच्या चित्रपटांतून पाहायला मिळतं. अशातच अभिनेत्रीने एका मुलाखतीमध्ये करिअरच्या सुरुवातीच्या काळात घडलेल्या एका प्रसंगाबद्दल सांगितलं आहे.
विद्याने रॉड्रिगो कॅनेलासशी संवाद साधताना याबद्दल सांगितलं आहे. यामध्ये तिने जुन्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. तिने तिचा पहिला चित्रपट ‘चक्रम’बद्दल सांगितलं आहे, ज्यामधून तिचं पदार्पण होणार होतं. पंरतु, तो चित्रपट पुढे बनलाच नाही. या मुलाखतीमध्ये विद्याने सांगितलं की, “मी चित्रपटासाठी काम करायला सुरू केलं, सगळं छान सुरू होतं. पण, १५ दिवसांनंतर त्यांनी मला पुन्हा मुंबईला पाठवलं. एक सीन केल्यानंतर ते म्हणाले शेड्यूल संपलं आणि त्यांनी मला मुंबईला पाठवलं.”












