2.3 C
New York
Tuesday, December 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

अपहरण, अमानुष मारहाण आणि लैंगिक अत्याचार… परभणीच्या दोन तरुणांची शोकांतिका

मुंबई : एका अल्पवयीन मुलासह दोघांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करून एकमेकांसोबत लैंगिक कृत्य करायला भाग पाडणारा एक भयंकर प्रकार भुलेश्वर येथे उघडकीस आला. याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याने एका आरोपीला अटक केली असून त्याच्या तीन फरार साथीदारांचा शोध सुरू आहे. या तरुणांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे आरोपीने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दोन्ही पीडित परभणी जिल्ह्यातील असून यापैकी एक अल्पवयीन आहे,, तर दुसरा पीडित १९ वर्षांचा आहे. या दोघांनी एका अंगडियाकडून कर्ज घेतले होते. मात्र ते कर्जाची परतफेड करू शकले नाहीत. अंगडिया आणि त्याच्या साथीदारांनी ४ जुलै रोजी या दोन्ही पीडितांना परभणी येथून आपल्या वाहनात बळजबरीने बसवून पुण्यात आणले. तेथून त्यांच्यावरील अत्याचाराला सुरवात झाली.

अमानुष मारहाण

गाडीमध्ये या दोघांना मारहाण करण्यात आली. पुण्याला नेऊन त्यांना एका खोलीत डांबण्यात आले. तेथे ४ जणांनी चामड्याच्या पट्ट्याने आणि लाथाबुक्क्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. बाहेर पडायचे असेल तर तात्काळ घेतलेल्या पैशांची परतफेड करावी लागेल, असे सांगण्यात आले. त्यानंतर या दोघांना मुंबईतील भुलेश्वरमधील काळबादेवी रस्त्यावरील पोकळवाडी इमारतीतील पहिल्या मजल्यावर आणण्यात आले. तेथे या आरोपीचे कार्यालय होते. तेथे या दोघांना पुन्हा मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांचे कपडे काढून एकमेकांसोबत शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. या कृत्याचे आरोपीनी आपल्या मोबाइलमध्ये चित्रिकरण केले.

एकाला अटक, तिघे फरार

या पीडित तरुणांनी आपल्या घरी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यापैकी एका तरुणाच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. लोकमान्य टिळक मार्ग (एल. टी. मार्ग) पोलिसांनी याप्रकऱणी अंगडियाला अटक केली. त्याच्या तीन साथीदारांचा शोध सुरू आहे. सुटका करण्यात आलेल्या दोन्ही मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. आरोपींविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम ११८ (१), १२७ (२), १३७ (२), १४० (३), ३(५), तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यातील कलम १२, १४ (२), ४ आणि ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक तडाखे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक भाले करीत आहेत.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in