गुरूग्राम येथील २५ वर्षीय राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादवची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. राधिकाच्या वडिलांनीच हरियाणाच्या गुरुग्राम येथे राहत्या घराती ही हत्या केल्याचे समोर आले आहे. समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, राधिकाच्या वडिालांनी तिच्यावर लागोपाठ तीन गोळ्या झाडल्या. कथितपणे सोशल मीडियावरील एका पोस्टवरून त्यांच्यात वाद झाल्यानंतर ही हत्या झाल्याचे सांगितले जात आहे.












