राधिका यादव या २५ वर्षीय राज्य स्तरीय टेनिसपटूला तिच्याच वडीलांनी गोळ्या घालून ठार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरूवारी गुरुग्राम येथील तिच्या राहत्या घरात ही घटना घडली. तिचे वडील दीपक यादव यांनी तिच्यावर तीन गोळ्या झाडल्याचा आरोप असून इतर कुटुंबीयांनी दिलेल्या जबाबानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. गुरूवारी सकाळी गुरुग्राममधील सेक्टर ५७ मधील त्यांच्या स्वयंपाक घरात १०.३० वाजता ही घटना घडली.












