अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या स्थितीबद्दल वारंवार विचलित करणाऱ्या बातम्या पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा भीषण प्रकार समोर आला आहे. येथे एका ४५ वर्षीय व्यक्तीने एका सहा वर्षीय मुलीबरोबर लग्न केल्याची घटना प्रकार अफगाणीस्तानमधील हेल्मंड प्रांतात घडली. अमेरिकेतील आउटलेट Amu.tv ने दिलेल्या वृत्तानुसार, हा प्रकार समोर आल्यानंतर तालिबानने त्या संबंधित व्यक्तीला त्या मुलीला घरी घेऊन जाण्यापासून रोखलं. मात्र त्यांनी मुलगी ९ वर्षांची झाल्यानंतर तिला तिच्या पतीच्या घरी घेऊन जाता येईल, असे सांगितल्याची बाब समोर आली आहे.












