मुंबई : अनेक वर्षांपासून देवनार कचराभूमीत साचलेले कचऱ्याचे डोंगर साफ करण्यासाठी मुंबई महापालिकेने मागवलेल्या निविदा भरण्याची मुदत संपली असून तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. या तीन कंपन्यांपैकी केवळ एकाच कंपनीला कचरा विल्हेवाटीच्या क्षेत्रातील कामाचा अनुभव आहे. अन्य दोन कंपन्या पायाभूत प्रकल्प क्षेत्रातील आहेत. या दोन कंपन्यांनी यापूर्वी अदानी कंपनीसोबत संयुक्त भागिदारीत पायाभूत प्रकल्पासाठी काम केले आहे.












