भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून १४ मे रोजी शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवन येथे त्यांना शपथ दिली होती. माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना हे १३ मे रोजी निवृत्त झाले होते. बी. आर. गवई हे आता २३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत. दरम्यान, त्यांच्या या नियुक्ती निमित्त आज महाराष्ट्र विधीमंडळात त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.












