महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करण्यासंबंधीचे दोन अध्यादेश राज्य सरकारने काढले होते. मात्र तिसरी भाषा ही हिंदी किंवा इतर कुठलीही असेल असा पर्यायही दिला होता. तरीही राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी या त्रिभाषा सूत्राला विरोध दर्शवला. एवढंच नाही तर सरकारने वाढत्या विरोधानंतर हा अध्यादेश मागे घेतला. मात्र यामुळे एक महत्त्वाची घडामोड घडली. ती घडामोड म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकाच मंचावर येणं. ही घटना ऐतिहासिक ठरली. दरम्यान आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी भाषेबाबत भूमिका मांडली होती ते समोर आलं आहे.












