राजापूर – राजापुर शहरात आषाढी एकादशी आणि मोहरम निमित्ताने गेल्या दोन दिवसांपासून पोलीस बंदोबस्त असतानाही शनिवारी सायंकाळी उशिरा दिवसाढवळ्या झालेल्या चोरीने शहरासह तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे. शहरातील लॅविश अपार्टमेंट या निवासी संकुलामध्ये चोरट्यांनी तब्बल १२ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची माहीती राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अमित यादव यांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या झालेल्या चोरी नंतर चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. संतोष भामुद्रे यांच्या मालकीचा लॅविश या निवासी संकुलामध्ये सदनिका आहे.
बुलढाणा येथील मुळ रहिवाशी असलेले भामुद्रे कुटुंबिय गेली अनेक वर्ष राजापूर येथे वास्तव्याला असून ते आठवडा बाजारात फळ विक्रीचा व्यवसाय करतात. ते शनिवारी सायंकाळी कामानिमित्ताने बाहेर गेले होते. त्याचवेळी त्यांची पत्नी व मुलेही घराबाहेर होती.












