आपल्या आवडत्या कलाकारांच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. त्यांच्या दिनचर्येपासून ते छान दिसण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी ते काय खातात, हेही चाहत्यांना जाणून घ्यायचे असते.
कलाकारांच्या रिलेशनशिपबद्दलही चाहत्यांच्या मनात उत्सुकता असते. आता अभिनेत्री श्रद्धा कपूर एका व्हिडीओमुळे मोठ्या चर्चेत आली आहे. श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये श्रद्धा काही विचित्र गोष्टी, डान्स करताना दिसत आहेत. एकाच व्हिडीओमध्ये तिचे विविध ठिकाणचे काही व्हिडीओ आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना तिने दिल पे चलाई छुरियाँ हे गाणे लावले आहे. तसेच तिने लिहिले की माझा वेडेपणा कोण रोखू शकतं?
श्रद्धाने शेअर केलेला व्हिडीओ आता चर्चेचे कारण ठरत आहे. कारण- श्रद्धा डान्स करत असताना तिच्या पाठीमागे एक व्यक्ती बसलेली दिसत आहे. ही व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध निर्माता राहुल मोदी आहे. राहुल मोदी आणि श्रद्धा कपूर हे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, अद्याप या दोघांनीदेखील यावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. ते त्यांचे नाते कधी उघड करणार, याबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे.
श्रद्धाच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत श्रद्धाचे कौतुक केले आहे. तर काहींनी श्रद्धाचा विचित्र डान्स पाहून कोणी इतकं हुशार कसं असू शकतं, अशा कमेंट्स केल्या आहे. तर काहींनी व्हिडीओमध्ये राहुल मोदी दिसत असल्याचे म्हटले आहे. नेटकरी काय म्हणाले आहेत ते जाणून घेऊ…
नेटकरी काय म्हणाले?
“क्यूट”, “इतकं टॅलेंट कोणामध्ये कसं असू शकतं?”, “तू शेअर केलेल्या व्हिडीओमुळे माझं सगळं टेन्शन दूर झालं”, “लाल शर्टमधील व्यक्ती कोण आहे”, “तुझ्याशी कोणी स्पर्धा करू शकत नाही”, “श्रद्धा मलादेखील या स्टेप शिकायच्या आहेत”, “एका क्लिपमध्ये राहुल मोदी आहे, याकडे कोणी लक्ष दिले का?”, “शेवटच्या व्हिडीओमध्ये तुझ्या पाठीमागे कोण आहे”, “व्हिडीओच्या शेवटी राहुलला कोणी बघितंल?”, “व्हिडीओमध्ये राहुल मोदी दिसत आहे”, अशा अनेक कमेंट्स श्रद्धाच्या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत. श्रद्धा आणि राहुल काही कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावताना याआधी दिसले आहेत. त्यांनी एका चित्रपटात एकत्र कामही केले आहे.
कामाच्या बाबतीत बोलायचे तर अभिनेत्री २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री २’मध्ये दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. ती ‘स्त्री ३’मध्येदेखील दिसणार आहे. हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.












