देशात सरकारी कामात घोटाळा झाल्याचे अनेकदा पाहायला मिळते, मात्र मध्यप्रदेशमधील एका शाळेत झालेल्या घोटाळ्याने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. मध्यप्रदेशच्या शाहडोल जिल्ह्यातील साकंदी गावातील एका सरकारी शाळेत एका भिंतीला चार लिटर रंग देण्यासाठी १६८ कामगार आणि ६५ गवंडी वापरण्यात आल्याचा आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर या कामाच्या बिलाची सध्या जोरदार चर्चा होत आहे












