स्टार प्रवाहवर नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्याचे पाहायला मिळते. आता या वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘हळद रुसली, कुंकू हसलं’ असं या मालिकेचं नाव आहे.
स्टार प्रवाहने हळद रुसली, कुंकू हसलं या मालिकेची थीम सांगणारे अनेक व्हिडीओ आणि प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या मालिकेची प्रेक्षकदेखील आतुरतेने वाट पाहत आहेत.
या मालिकेचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. या प्रोमोमध्ये हीरोची गाडी चिखलात स्लीप होते, असे दाखवण्यात आले आहे. गाडी स्लीप झाल्यानंतर दुष्यंत कृष्णाच्या अंगावर पडतो आणि दोघांमध्ये तिथेच वाद सुरू होतो.












