व्यावसायिक सुशील केडिया यांनी सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये आणि काही वृत्तवाहिन्यांना प्रतिक्रिया देत मराठी येत नसल्याचं सांगत आपण मराठी शिकणार नसल्याच्या संदर्भात एक पोस्ट एक्सवर (ट्विटर) शेअर केली होती. सुशील केडिया यांच्या या पोस्टनंतर मनसेच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार टीका केली होती. या टिकेनंतर आता अखेर सुशील केडिया यांनी माफी मागितली आहे.












