लोकप्रिय अभिनेत्री रेखा यांचा ‘उमराव जान’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन ४४ वर्षे झाली. परंतु, अजूनही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. मुझफ्फर अली यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. चित्रपटाची कथा, गाणी आणि रेखाचं सादरीकरण या सगळ्यामुळे या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटाद्वारे रेखाच्या पात्राला प्रेक्षकपसंती मिळाली होती. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
‘उमराव जान’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ४४ वर्षे झाल्यानिमित्ताने चित्रपटाच्या दिग्दर्शकाने ‘इंडिया टुडे’शी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी चित्रपटातील काही किस्से सांगितले. या मुलाखतीदरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक मुझफ्फर अली यांनी, ‘उमराव जान’ हा चित्रपट रेखाची पहिली पसंती नव्हता, असा खुलासा केला आहे.












