‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतील लक्ष्मी, श्रीनिवास, जान्हवी, आनंदी, सिद्धू, भावना, व्येंकी, पूर्वी, मंगल, हरिश, वीणा, जयंत अशी सर्वच पात्रे त्यांच्या वेगळेपणामुळे सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असल्याचे दिसत आहे.
मालिकेत सध्या भावना व सिद्धू यांच्या लग्नाचा ट्रॅक पाहायला मिळत आहे. अनेक अडचणीनंतर सिद्धूचे भावनाशी लग्न करण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. भावना मनापासून या लग्नाला तयार नव्हती असे पाहायला मिळाले. पण, सिद्धू तिला वेळोवेळी साथ देत असल्याचे दिसते. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मात्र, मालिकेतील कलाकार एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत.
राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राअंतर्गत इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय लागू करण्याचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. हिंदी भाषा सक्तीमुळे सर्व स्तरातून विरोध केला जात होता. अनेक कलाकारांनीदेखील यावर वक्तव्य केले होते. आता ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील कलाकारांनी ‘तारांगण’शी संवाद साधताना मराठी भाषेविषयी वक्तव्य केले आहे.












