संजय लीला भन्साळी हे हिंदी सिनेविश्वातील मोठं नाव. आजवर त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन व निर्मिती केली आहे. कामाच्या बाबतीत शिस्तप्रिय आणि सदैव काहीतरी वेगळं करण्याच्या शोधात ते असतात, म्हणून त्यांच्या कलाकृतींना प्रेक्षकांचा कायम सकारात्मक प्रतिसाद मिळालेला दिसतो.












