6.7 C
New York
Wednesday, January 14, 2026

Buy now

spot_img
spot_img

पिंपरी चिंचवडमध्ये चारचाकीने श्वानाला चिरडले; चालकाविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड: नवी सांगवी येथे कारचालकाने श्वानास चिरडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना नवी सांगवीतील फेमस चौक येथे घडली. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सांगवी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन ढावळे असे श्वानाला चिरडणाऱ्या वाहनचालकाचे नाव आहे. घटने प्रकरणी कुणाल कामत यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

बुलढाणा अर्बन बँक फेमस चौक येथे एम.एच १२ व्ही.टी ०४४९ या नंबरच्या गाडीने फुटपाथ जवळ झोपलेल्या श्वानाला पाहून त्याच्या अंगावर गाडी घातली. पाठीमागे गाडी घेत असताना पुन्हा श्वानाच्या अंगावर गाडी घातली. अनेकांनी त्यांना सांगितले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. श्वान विव्हळत होता, गंभीर जखमी झालेला श्वान बेशुद्ध पडला.

याबाबतची माहिती श्वान प्रेमी कुणाल यांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन श्वानाला रुग्णालयात नेले. सध्या श्वानावर उंड्री येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सांगवी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस) २०२३ कलम ३२५, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० कलम ११(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in