पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर गेले तीन वर्ष पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईताला वारजे पोलिसांनी अटक केली. आकाश सिब्बन गौड (वय २३, रा. .शिवणे, मूळ रा. गोरखपुर, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध वारजे माळवाडी आणि मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गंभीर गु्न्हे दाखल आहेत.












