काजोल व अजय देवगण ही बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. अजय देवगण काही दिवसांपूर्वी ‘रेड २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.
काजोलची प्रमुख भूमिका असलेला ‘माँ’ चित्रपट २७ जूनला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता अभिनेत्री काजोल मात्र एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.
काजोल काय म्हणालेली?
काजोलने पती अजय देवगणसह ‘कॉफी विथ करण’च्या सहाव्या सीझनच्या एका एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी करण जोहरने अजय देवगणला प्रश्न विचारलेला की, काजोल तिच्या स्वत:साठी अजिबात पैसे खर्च करत नाही. ती बॉलीवूडमधील मोठी स्टार आहे. या इंडस्ट्रीमध्ये खूप पैसे कमावले जातात आणि खूप पैसे खर्च केले जातात. तर माझा अजयसाठी प्रश्न आहे की, काजोल तिच्या पैशांचे काय करते? कारण- मी तिच्याकडे कधीही डिझायनर बॅग्ज पाहिल्या नाहीत. पण, तिच्याकडे विचित्र ब्रँडच्या वस्तू असतात, ज्याचे नाव मी कधीच ऐकलेले नसते. करण जोहरच्या या प्रश्नावर अजय देवगण गमतीने म्हणाला होता की, ती सांताक्रूझ मार्केटमधून खरेदी करते. सध्या ती ऑनलाइन शॉपिंगकडे वळली आहे. दररोज ७-८ पार्सल घरी येत असलेले मी पाहतो.












