बॉलीवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ असलेल्या आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ हा सिनेमा २० जून २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमाच्या अपयशानंतर जवळपास ३ वर्षांनी आमिर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर परतल्यामुळे या सिनेमाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर आमिरच्या सिनेमाने शंभर कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे.
आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाने १० दिवसांत १२२.८९ कोटींचा गल्ला जमावला आहे. याशिवाय सिनेमाने मूळ बजेटही वसूल केलं आहे.
याशिवाय, २७ जूनला बॉक्स ऑफिसवर काजोलचा ‘माँ’ चित्रपट सुद्धा प्रदर्शित झाला. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. काजोलच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४.६५ कोटी, दुसऱ्या दिवशी ६ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ६.७५ कोटींची कमाई केली आहे. ३ दिवसांत या सिनेमाने फक्त १७.४० कोटी कमावले आहेत.












