मुंबई : हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात राज्यभर रविवार २९ जून रोजी या शासन निर्णयाची होळी करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईत वांद्रे तसेच दादरमध्ये या शासन निर्णयाची होळी केली जाणार आहे. त्यांच्या या आंदोलनात काँग्रेससह अन्य विरोधी पक्षही सहभागी होणार आहेत. दुसरीकडे ५ जुलै रोजीच्या आंदोलनाची जोरदार तयारी सुरू असून त्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेकडून पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.












