-0.1 C
New York
Saturday, December 6, 2025

Buy now

spot_img
spot_img

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारीच निघाला लाचखोर; भ्रष्ट सरकारी कर्मचाऱ्यांकडून घ्यायचा हप्ता

कुंपणच शेत खातं किंवा रक्षकच भक्षक झाला, अशा अर्थाच्या म्हणी आपण ऐकतो. या म्हणींचा अर्थ उमगणाऱ्या घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. शासनाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे काम असते, भ्रष्ट सरकारी नोकरांवर चाप लावणे. नागरिकांना सरकारी सुविधा विनासायस मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करणे. पण याच विभागातील अधिकारी भ्रष्ट झाले तर काय? राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात असा एक प्रकार घडला आहे. जेव्हा याच विभागातील अधिकाऱ्याकडे बेहिशेबी रोकड आढळून आले. त्यानंतर उघड झाले भ्रष्टाचाराचे धक्कादायक प्रकरण.

राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नोकरी करणारे आणि झालावाड येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून तैनात असलेले जगराम मीणा यांना त्यांच्याच विभागाने बेहिशेबी रोख रकमेसह पकडले. शिवदासपुरा टोल प्लाझा येथे अचानक तपासणीदरम्यान मीणा यांच्या वाहनाची तपासणी करण्यात आली, तेव्हा मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक डॉ. रवी प्रकाश मेहरदा यांनी सांगितले की, जगराम मीणा भ्रष्टाचारात गुंतला असून सरकारी विभागात त्याच्याबद्दलची कुणकुण त्यांच्या कानावर आली. मीणा भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांकडून दर महिन्याला पैसे गोळा करत असल्याची माहिती त्यांना मिळाली. हे पैसे घेऊन मीणा भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांना एकप्रकारे सरंक्षण देत होता. झालावाड येथे दर आठवड्याला पैसे गोळा करण्यासाठी येऊन त्यानंतर मीणा गाडीने जयपूरला जात असे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी याआधीही मीणा याला अटक करण्यासाठी सापळा रचला होता. मात्र त्यावेळी तो निसटण्यात यशस्वी ठरला होता.

२७ जून रोजी गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मीणाने मोठी रोकड गोळा केली असून तो जयपूरला येत असल्याची माहिती मिळाली. विभागाचे उपमहानिरीक्षक राजेश सिंह यांच्या नेतृत्वाखालील पथकाने टोला नाक्यावर त्यांचे वाहन थांबवले आणि गाडीची तपासणी केली असता त्यात ९.३५ लाख रुपये आढळून आले.

एसीबीचे महासंचालक डॉ. रवी प्रकाश मेहरदा यांनी सांगितले की, सदर रोकड कुठून आणली याचे पुरावे देण्यात मीणा असमर्थ ठरले. तसेच मीणा यांच्या संपत्तीची चौकशी केली असता त्यांच्या उत्पन्नापेक्षाही अधिक मालमत्ता आढळून आली. जयपूर येथील मीणा यांच्या निवासस्थानी धाड टाकली असता तिथेही ३९.५ लाखांची रोकड आढळून आली. तसेच जमीन, फ्लॅट घेतल्याचे कागदपत्रेही हाती आले.

मीणा यांच्या जयपूर येथील निवासस्थानी ८५ विदेशी उंची मद्याच्या बाटल्याही आढळून आल्या. यानंतर मीणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मीणा यांना एसीबी विभागातून निलंबित करण्यात आले असून त्यांच्याविरोधात चौकशी सुरू करण्यात आली आहे.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in