-0 C
New York
Saturday, December 6, 2025

Buy now

spot_img
spot_img

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना कधीपासून सुरू झाली? पहिला हप्ता कोणत्या महिन्यात मिळाला?

 महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. महाराष्ट्र राज्य सरकारकडून ही योजना महिलांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली असून याचा लाभ राज्यातील लाखो गरजू महिला घेत आहेत.

योजना कधीपासून सुरू झाली?

महाराष्ट्र राज्य शासनाने जुलै २०२४ मध्ये महिलांसाठी ही योजना सुरू केली. जवळपास एक वर्ष पूर्ण होत आलेल्या या योजनेच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्याचा सरकारचा हेतू आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्याच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली होती.

पहिला हप्ता कधी मिळाला होता?

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही जुलै २०२४ पासून सुरू झाली. या योजनेचा पहिला हप्ता १४ ऑगस्ट २०२४ रोजी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता. हा हप्ता जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी एकत्रित, म्हणजेच ३००० रुपये इतका होता. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ही रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाली होती. जून २०२५ पर्यंत या योजनेचे ११ हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.

लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत राज्य सरकार राज्यातील पात्र महिलांना आधार मिळावा यासाठी दर महिन्याला एक ठराविक आर्थिक मदत देते. ही योजना ‘माझी लाडकी बहीण योजना’ म्हणूनही ओळखली जाते. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या वंचित महिलांना स्वावलंबी आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेचे निकष पूर्ण केल्यानंतर पात्र ठरलेल्या महिलांना या योजनेंतर्गत थेट त्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदत दिली जाते.

या योजनेचा लाभ जुलै २०२४ या महिन्यापासून मिळण्यास सुरूवात झाला आहे. ज्यामध्ये २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमाह १५०० रुपये दिले जातात. या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो. ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा महिला १८१ या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून याबद्दल सविस्तर माहिती घेऊ शकतात किंवा https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या लाडकी बहीण योजना महाराष्ट्राची अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शतात.

योजनेचा लाभ काय मिळतो?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत, पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये मिळतील. म्हणजेच लाभार्थी महिलांना दरवर्षी १८,००० रुपये दिले जाणार. ही रक्कम संबंधितांच्या थेट लाभ हस्तांतरा (DBT)द्वारे महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे?

  • अर्जदार महाराष्ट्रातील राज्यातील रहिवासी असावा.
  • अर्जदार ही महिला असावी.
  • अर्जदार विवाहित, घटस्फोटित, विधवा, परित्यक्त, निराधार किंवा कुटुंबातील एक अविवाहित महिला असू शकते.
  • महिलेचे २१ वर्षे ते ६५ वर्षे यादरम्यान असावे.
  • अर्जदारांचे स्वत:चे बँक खाते आधार कार्डाशी जोडलेले असावे.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदार आउटसोर्स केलेले कर्मचारी, कंत्राटी कामगार व २.५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेले स्वयंसेवी कामगार असू शकतात.

लाडकी बहीण योजनेतून कोण वगळले जाणार?

खालीलपैकी कोणत्याही अटी लागू होणाऱ्या महिला या योजनेंतर्गत अपात्र असतील.

  • ज्या महिलेचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
  • ज्या महिलेच्या कुटुंबातील सदस्यांचे उत्पन्न करपात्र आहे.
  • ज्या महिलेचे कुटुंबातील सदस्य सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत किंवा भारत सरकारमध्ये नियमित किंवा कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून काम करीत आहेत किंवा निवृत्तीनंतर पेन्शन घेत आहेत. पण, जर कुटुंबातील सदस्य आउटसोर्स केलेले कर्मचारी, कंत्राटी कामगार आणि स्वयंसेवी कामगार असतील, तर ती महिला या योजनेसाठी पात्र असेल.
  • ज्या महिलेला इतर सरकारी विभागांद्वारे राबविल्या जाणाऱ्या इतर कोणत्याही आर्थिक योजनेंतर्गत दरमहा रु. १,५०० किंवा त्याहून अधिक पैसे मिळतात.
  • ज्या महिलेच्या कुटुंबातील सदस्य सध्याचे किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत.
  • ज्या महिलेच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, मंडळ, संचालक, महामंडळ किंवा उपक्रमाचे सदस्य आहेत.
  • ज्या महिलेच्या कुटुंबातील सदस्यांकडे चारचाकी वाहन आहे (ट्रॅक्टर वगळता).

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे आहे-

१. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.(https://ladakibahin.maharashtra.gov.in/)
२. ‘अर्जदार लॉग इन’ पर्यायावर क्लिक करा.
३. ‘खाते तयार करा’वर क्लिक करा.
४. अर्ज भरा आणि ‘साइन अप’ बटणावर क्लिक करा.
५. तुमचा मोबाइल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड वापरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाइटवर लॉग इन करा.
६. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज’वर क्लिक करा.
७. तुमचा आधार क्रमांक एंटर करा आणि ‘सबमिट करा’वर क्लिक करा.
८. अर्जावर आवश्यक तपशील एंटर करा, कागदपत्रे अपलोड करा आणि ‘सबमिट करा’वर क्लिक करा. तुम्हाला एसएमएसद्वारे अर्ज आयडी मिळेल.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in