ठाणे – सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षांकरिता १.५ कि.मी. करिता किमान २६ रुपये इतक्या भाडेदरवाढीला मान्यता देण्यात आली. या निर्णयाच्या अनुषंगाने ठाणे परिवहन विभागाच्या कार्यक्षेत्रातील विविध शेअर रिक्षा मार्गांवरील भाडेदर नव्याने निश्चित करण्यात आले आहेत. मात्र काही रिक्षाचालकांकडून नव्याने निश्चित करण्यात आलेल्या दरांपेक्षा अधिक भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर रिक्षा चालकांच्या मनमानी कारभारा विरोधात तक्रार करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून व्हाट्सॲप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.












