मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यातील १९ वाहनांमध्ये डिझेलऐवजी पाणी भरल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ वाहने अचानाक बंद पडल्यामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. दरम्यान, या घटनेनंतर संबंधित पेट्रोल पंपावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.












